Nashik News : वसंत ऋतूच्या आगमनाने बहरली रानफुलांची बाग; रणरणत्या उन्हात पुष्पोत्सवामुळे फिटतात डोळ्यांचे पारणे

Nashik : गेल्या काही दिवसांपासून मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे आग ओकणाऱ्या सुर्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
With the arrival of spring in the scorching sun, attractive flowers of various trees bloom in Salher area and Katwan valley of Baglan taluka.
With the arrival of spring in the scorching sun, attractive flowers of various trees bloom in Salher area and Katwan valley of Baglan taluka.esakal

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे आग ओकणाऱ्या सुर्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचे आगमन झाल्यामुळे सृष्टीचे अनोखे रूप निसर्गप्रेमींना मोहिनी घालत आहे. बागलाण तालुक्याच्या पश्‍चिमेकडील आदिवासी भागात तसेच पूर्वेकडील काटवन खोऱ्यात ऐन उन्हाळ्यात विविध रंगांनी फुललेल्या आकर्षक फुलांमुळे नागरिकांना सुखद गारवा मिळत आहे. ( wildflower garden bloomed with arrival of spring )

सर्व ऋतूंचा राजा असलेल्या वसंत ऋतूच्या आगमनाने रणरणत्या उन्हात आपले सौंदर्य खुलवून ठेवणाऱ्या पुष्पोत्सवामुळे डोळ्यांचे पारणे फिटत आहे. वसंत ऋतू चैतन्याची लहर म्हणून ओळखला जातो. त्याच्या आगमनाची चराचर सृष्टी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. झाडे आपल्या संपूर्ण कायेची पड़झड करून सौंदर्याचा नवा साज परिधान करायला आतुर असतात. त्यामुळे फुलझाडांना जणू वसंत ऋतूचे डोहाळे लागलेले असतात.

मोसम खोऱ्यातील साल्हेर, मुल्हेर परिसरात तसेच साक्री रस्त्यालगत असणाऱ्या काटवन खोऱ्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात विविध रानफुलांची झाडे बहरलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नयनरम्य फुलांचा वसंतोत्सव बहरला आहे. नानाविध रूप, रंग, रस, गंध आणि आकाराची फुले वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. (latest marathi news)

With the arrival of spring in the scorching sun, attractive flowers of various trees bloom in Salher area and Katwan valley of Baglan taluka.
Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून नऊ जण बेपत्ता; 5 महिला, युवती आणि 4 पुरुषांचा समावेश

निष्पर्ण झालेल्या झाडांच्या अंगाखांद्यावर बहरलेल्या पुष्पोत्सवामुळे उन्हाची तीव्रता काहीअंशी कमी जाणवत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. हसऱ्या, नाचऱ्या, आल्हाददायक श्रावण महिन्याप्रमाणे ऋतूचा राजा असलेल्या वसंताचीही एक साखळी असते. फाल्गुन, चैत्र, वैशाख हे तीन मराठी महिने वसंत ऋतूच्या अनेकविध रंगांनी नटलेले असतात. रखरखत्या उन्हातही आपले सौंदर्य टिकवून ठेवणाऱ्या नैसर्गिक सृष्टीचा खराखुरा सोबती म्हणून वसंत ऋतूला अनन्यसाधारण महत्व आहे.

रामायणात सुंदर वर्णन

वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. ‘वसंत’ ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत वसंत ऋतूस कुसुमाकर असे संबोधले आहे.

With the arrival of spring in the scorching sun, attractive flowers of various trees bloom in Salher area and Katwan valley of Baglan taluka.
Nashik News : सटाणा शहर वळण रस्ता की उड्डाणपूल? दुतर्फा अतिक्रमणामुळे मार्ग बनला मृत्यूचा सापळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com