Nashik Crime News
esakal
सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल (Nashik Woman Dies) झाला आहे. घराशेजारी खेळत असताना दहा वर्षांच्या बालिकेला अचानक विद्युत तारांचा स्पर्श झाला आणि ती विजेच्या तीव्र प्रवाहात सापडली. निरागस जीव संकटात सापडलेला पाहून गावातीलच मूकबधिर महिला सविता केदा पवार (उर्फ सोनाली, वय ३२, रा. नवेगाव, ता. बागलाण) धावून गेल्या.