Nashik News : उन्हाच्या तडाख्यात कुरडई, पापड तयार करण्याचा धडाका

Nashik News : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. उकाड्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे महिलांनी मात्र कुरड्या, पापड यासह विविध पदार्थ तयार करण्याचा धडाका लावला आहे.
kurdai dried in the sun.
kurdai dried in the sun.esakal

Nashik News : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. उकाड्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे महिलांनी मात्र कुरड्या, पापड यासह विविध पदार्थ तयार करण्याचा धडाका लावला आहे. घरगुतीसह व्यावसायिक अशा प्रकारचे पदार्थ तयार करण्यात व्यस्त दिसून येत आहे. (women Making kurdai papad even in hot summer)

उन्हाळ्यात घरोघरी कुरड्या, पापड, चकली, वेफर्स, डाळीचे वडे यासह विविध वस्तू तयार करण्याची लगबग दिसून येत असते. पुरातन काळापासून अशा प्रकारची कामे उन्हाळ्यात केली जात आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक लगबग दिसून येत असते. पदार्थ तयार झाल्यानंतर ते वाळण्यासाठी कडक उन्हाची आवश्यकता असते.

सध्या तसाच उन्हाळा जाणवत आहे. ठिकठिकाणी महिला असे पदार्थ तयार करताना दिसून येत आहे. शहरात याचे प्रमाण कमी झाले असले तरी काही भागात आजही घरगुती स्तरावर मोठ्या प्रमाणावर हे पदार्थ तयार केले जात आहे. तर काहींनी यातून लघुउद्योग सुरू केल्याने अशा व्यावसायिकांकडूनही असे पदार्थ तयार करून विक्री केले जात आहे.

भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून याकडे बघितले जाते. त्यामुळे इतक्या प्रचंड उन्हातही महिला वर्गाकडून अतिशय उत्साहात पदार्थ तयार केले जात आहे. कुरड्या, पापड तयार करण्याचे अधिक प्रमाण आहे. इतर पदार्थांपेक्षा यांना अधिक मागणी असल्याने त्यांचे तयार करण्याचे प्रमाणही अधिक आहे. (latest marathi news)

kurdai dried in the sun.
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, भगरेविरोधातील तक्रारी निकाली; छाननीअंती नाशिक मतदारसंघातून 36 जणांचे अर्ज वैध

महिलांना रोजगार

पूर्वी कुरड्या पापड सह अन्य पदार्थ घरगुती स्तरावर तयार केले जात होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तसे करणे अनेकांना शक्य नाही. त्यांच्याकडून ऑर्डर देऊन पदार्थ तयार करून घेतले जात आहे. त्यातूनच हळूहळू व्यवसाय निर्मिती झाली. ऑर्डरचे पदार्थ तयार केल्या जात असताना त्यांच्याकडून अधिक प्रमाणात ते पदार्थ तयार करून किलोच्या भावात विक्री केले जाऊ लागले.

नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळाल्याने घरगुती उद्योगाचे रूपांतर लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये झाले आहे. बाजारात अनेक ठिकाणी तयार कुरड्या, पापड, चकली, वेफर्स मिळत आहे. त्यातून महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे.

kurdai dried in the sun.
Nashik Lok Sabha Constituency : महायुती विरुध्द महाविकास आघाडीत प्रचार युध्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com