Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, भगरेविरोधातील तक्रारी निकाली; छाननीअंती नाशिक मतदारसंघातून 36 जणांचे अर्ज वैध

Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन इच्छुक अपात्र ठरले असून दिंडोरीत पाच इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याने त्यांना निवडणुकीतून बाहेर पडावे लागेल.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituencyesakal

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन इच्छुक अपात्र ठरले असून दिंडोरीत पाच इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याने त्यांना निवडणुकीतून बाहेर पडावे लागेल. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी आपल्यावरील गुन्हे लपवल्याची तर दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी संपत्ती लपवल्याची तक्रार करण्यात आली होती. (Nashik Lok Sabha Constituency)

या दोन्ही तक्रारी निकाली काढत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवले आहेत. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी जातीचा दाखला न दिल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरला आहे. छाननीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ३६ उमेदवार तर, दिंडोरीत एकूण १५ उमेदवार आखाड्यात शिल्लक आहेत. यापैकी सोमवारी (ता.६) किती उमेदवार माघार घेतात त्यावर निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होईल.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ३९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी (ता.४) नाशिकच्या अर्जांची छाननी केली. यात शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून दाखल केलेल्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नसल्याने तो अर्ज बाद झाला. निवृत्ती अरिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाकडून अर्ज दाखल केला होता.

त्यांनीही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांच्याही अर्ज बाद ठरवण्यात आला. अनिल जाधव यांनी भाजपकडे एबी फॉर्मची मागणी केली होती. पण त्यांनाही एबी न मिळाल्यामुळे त्यांचाही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. उपरोक्त तीनही उमेदवारांनी अधिकृत पक्षाच्या नावे दाखल केलेले अर्ज अपात्र ठरले तरी त्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने त्यांना निवडणूक लढविता येणार आहे.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपविल्याची तक्रार करण्यात आली. परंतु, उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती अपूर्ण वाटत असल्यास त्याविषयी न्यायालयात दाद मागण्याची सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी गोडसेंचा अर्ज वैध ठरवला. खासदार गोडसेंचा मार्ग मोकळा होताच भक्ती गोडसे यांनी शिवसेनेकडून दाखल केलेला ‘डमी’ अर्ज बाद झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली. (Latest Marathi News)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

जयदेव मोरे, भीमराव पांडवे यांनी अपूर्ण अर्ज भरल्याच्या कारणास्तव त्यांचेही अर्ज बाद झाले. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात आता एकूण ३६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी प्राप्त एकूण २० अर्जांची अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी छाननी केली.

यात एमआयएमचे अधिकृत उमेदवार खान गाजी व काशिनाथ वटाणे यांनी फक्त एकच अनुमोदक दिल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यांनी दहा अनुमोदकांची स्वाक्षरी घेतली असती तर अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज वैध ठरला असता. माकपचे जे. पी. गावित यांचा अर्ज वैध ठरल्याने सुभाष चौधरी यांचा अर्ज बाद ठरला. राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची मुलगी पल्लवी भगरे यांचा अर्ज अवैध ठरला.

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी अर्जासोबत जातीचा दाखला न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. भास्कर भगरे यांनी संपत्ती लपविल्याचा आक्षेप अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीने घेतला. पण त्यांना प्राधिकृत केल्याचे पत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांची तक्रार ग्राह्य धरण्यात आली नाही. अर्ज छाननीवेळी माजी आमदार जे. पी. गावित, सुभाष चौधरी, पल्लवी भगरे, पराग भगरे यांच्यासह डॉ.भारती पवार यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

आता सोमवारच्या माघारीकडे लक्ष

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आता सोमवारी (ता.६) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी मिळणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक आयोगाने विहित नमुन्यातील अर्ज दिला असून, हा अर्ज भरून स्वत: उमेदवारालाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उपस्थित राहावे लागेल.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

अन्यथा, अनुमोदकाला प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्याचे पत्र व त्या पत्रावर स्वाक्षरीचा नमुना देणे बंधनकारक आहे. ऑनलाइन किंवा अनुमोदकाला परस्पर उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे किती उमेदवार रिंगण सोडतात याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

नाशिकमधून यांचे अर्ज अपात्र

भक्ती अजिंक्य गोडसे, भीमराव जयराम पांडवे, जयदेव भिवसन मोरे यांची उमेदवारीच रद्द झाली. तर शांतीगिरी महाराज, अनिल जाधव, निवृत्ती अरिंगळे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल.

दिंडोरीत यांचे अर्ज बाद

खान गाझी, काशिनाथ वटाणे (एमआयएम), सुभाष चौधरी (माकप), पल्लवी भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), संजय चव्हाण यांची उमेदवारीच रद्द झाली आहे.

म्हणून संजय चव्हाणांनी भरला अर्ज

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे जातीचा दाखला नसल्याची माहीत असून त्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. दुसऱ्याच दिवशी छाननीत हा अर्ज बाद ठरला. पण या निकालाच्या आधारे आता त्यांना न्यायालयाकडे दाद मागणे शक्य होणार आहे. अपात्रतेचा त्यांचा मुद्दा ग्राह्य धरुन न्यायालय विधानसभेपूर्वी त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत दाखल खटल्याचा निकाल देवू शकते, म्हणून संजय चव्हाण यांनी दिंडोरीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जाते.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com