Women's Day 2024: बचत गटाच्या माध्यमातून सावरला विस्कटलेला संसार! नांदगावच्या सरला मोढे यांनी कुटुंबाला लावला हातभार

Success Story : जेमतेम परिस्थिती असलेल्या सरला मोढे या महिलेने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आपले जीवन कसे यशस्वी करता येते याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
Sarala Modhe
Sarala Modheesakal

नांदगाव : कमावती व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे अनेक असली की त्या कुटुंबाची कुतरओढ होते. तुटपुंजा पगारवर घरखर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशाच जेमतेम परिस्थिती असलेल्या सरला मोढे या महिलेने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आपले जीवन कसे यशस्वी करता येते याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. (Women's Day 2024)

बचत गटांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहून विश्व निर्माण करता येते हे त्यांनी दाखवून देताना दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील हेतू सिद्ध करून दाखविला आहे. (nashik International Womens Day 2024 Sarla Modhe of Nandgaon marathi news)

पती गावातल्या किराणा दुकानावर तुटपुंज्या पगारावर कामाला. पतीच्या मिळणाऱ्या पैशातून घरसंसाराचा गाडा ओढायचा तर हातभार लावायला हवा या विचाराने नांदगावच्या सरला चंद्रकांत मोढे यांनी लोकांच्या घराची धुणीभांडी केली तरीही मुलांचे शिक्षण त्यांचे संगोपन करताना मोठी ओढाताण व्हायची.

काही तरी मार्ग निघावा म्हणून सरलाताईची धडपड सुरूच होती. मुले लहान होती. त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी हातात पडेल ती कामे करता करता एक दिवस उजाडला. शहरात बचत गटाचे वारे वाहत होते. अन्य गरजू महिलांप्रमाणे त्यांनीही बचत गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. गुरुकृपा नावाच्या बचतगटात त्या सामील झाल्या.

या गटाला पहिल्या टप्प्यातच हजार रुपये मिळाले. त्यात त्यांनी शिलाई मशीन घेतले. शिलाई कामातून आधार मिळेल असा भाबडा आशावाद त्यामागे होता मात्र त्यात पदरी अपयश आले. याच काळात पती काम करीत असलेले किराणा दुकानही बंद पडले. त्यामुळे अडचणींचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नव्हते.

मुलेही हळूहळू मोठी होऊ लागली. त्यांच्या शिक्षणाचा खर्चही दुसरीकडे वाढू लागला. तुटपुंज्या मेहनतीतून घरखर्च भागविणे मुश्किल होत असताना संकटाचा मुकाबला करण्याची जिद्द सरलाताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. पुन्हा एकदा त्यांनी पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाचे प्रकल्पाधिकारी आनंद महिरे यांची भेट घेत आपली गाऱ्हाणी त्यांच्या पुढ्यात मांडली. (Latest Marathi News)

Sarala Modhe
International Women's Day 2024 : अन्नप्रक्रिया उद्योजिका घडविणारी ‘मसाला क्वीन’

घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्त्यांची परतफेड करणाऱ्या त्यांच्या बचतगटाला नव्याने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. या मिळालेल्या पैशातून त्यांनी स्वतःचे किराणा दुकान सुरु करण्याचा संकल्प तडीस नेला. त्यांच्या पतींना किराणा व्यवसायातील चढउतार, त्यातले बारकावे चांगले माहित असल्याने पतीचा त्या व्यवसायातील अनुभव आणि सरलाताई यांना या व्यवसायाने बऱ्यापैकी आर्थिक हातभार लावण्यास मदत झाली.

मुलांच्या शिक्षणाचा खर्चही निघू लागला.त्यांची आर्थिक ओढाताण कमी झाली त्यातून एका मुलीचा विवाह करता आला. त्यानंतर मुलाचेही लग्न करून देता आले मात्र एवढ्यावरच न थांबता सरलाताई कष्टाचे काम अजूनही करीत आहेत. शाळेतील मुलांच्या शालेय पोषण आहाराचे काम त्या करीत आहेत.

बचत गटाच्या सर्व महिलांना घरबसल्या रोजगार मिळतो हे ओळखून बचतगटाकडे वळालेल्या सरलाताई यांनी आर्थिक ओढाताण असलेला आपला संसार नेटका करण्यासाठी मोठे कष्ट घेतले. कष्ट सुरूच आहेत मात्र आता बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य त्यांना लाभले आहे.

Sarala Modhe
Women's Day 2024: पतीने वाऱ्यावर सोडूनही जिद्दीने बदलल्या भाग्याच्या रेषा! आखतवाडेच्या डाळिंब निर्यातदार 'ती'ची कहाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com