Nashik News : 500 मीटर रस्त्याचे काम 2 वर्षांपासून अपूर्ण

Nashik News : सामनगाव रोड वरील त्रिमूर्ती गार्डन ते एकलहरे रोडला जोडणाऱ्या पाचशे मीटर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडलेले आहे.
Five hundred meter road connecting Trimurti Garden on Samangaon Road to Eklahare Road.
Five hundred meter road connecting Trimurti Garden on Samangaon Road to Eklahare Road.esakal

Nashik News : येथील सामनगाव रोड वरील त्रिमूर्ती गार्डन ते एकलहरे रोडला जोडणाऱ्या पाचशे मीटर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे हा रस्ता कधी तयार होणार असा प्रश्‍न परिसरातील त्रस्त नागरिक विचारत आहेत. नाशिक रोड येथे नाशिक पुणे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. (work of 500 meter road incomplete for two years)

या महामार्गाला सिन्नर फाटा येथे चौफुली तयार होणार होती, परंतु काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या जागा तसेच एक मंदिर वाचविण्यासाठी हा रस्ता अरुंद करण्यात आल्याचा आरोप होत असून सिन्नर फाटा येथे चौफुली झाली नाही.

त्यामुळे सामनगाव रोडकडून येणारी वाहतूक मुख्य महामार्गाला जोडण्यासाठी सर्विस रोडने एकलहरे चौफुलीवर मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे महापालिकेकडून सामनगाव रोडने येणारी वाहतूक मुख्य महामार्गावर जोडण्यासाठी त्रिमूर्ती गार्डन समोरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार शेजारून एकलहरे रोड जोडण्यात येत आहे. (latest marathi news)

Five hundred meter road connecting Trimurti Garden on Samangaon Road to Eklahare Road.
Nashik Tribal Development : निविदा तक्रारी शासनाच्या कोर्टात! आदिवासी विभागाने मागविले मार्गदर्शन

मात्र या पाचशे मीटरच्या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरुच असून ते कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. आगामी काळ पावसाळ्याचा असून या रस्त्याचे काम त्या आधी पूर्ण न झाल्यास या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड होणार आहे.

"या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दोन वाहने जाऊ शकत नाहीत. सध्या उन्हाळा असताना अशी अवस्था आहे. पुढे पावसाळा सुरु झाला तर वाहन चालवणे अवघड होणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास ते फोनवर बोलत नाहीत." - प्रकाश घुगे, स्थानिक रहिवासी

Five hundred meter road connecting Trimurti Garden on Samangaon Road to Eklahare Road.
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com