
नाशिक : राज्यातील प्रगत शेतीत रासायनिक खतांचा वाढलेला वापर, जंगलतोड, चराई, जंगलातील आग, वाढते नागरीकरण व बांधकामे यामुळे मातीचा -हास वाढून पोत खराब होत आहे. ताटावर अन्न, प्रदूषणाला आळा व कार्बन संचय करीत जैवविविधता टिकविण्यासाठी मौल्यवान असलेल्या मातीचे मोल समजणे महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षांत लोकसेवा हमी कायद्यांतर्गत वैयक्तिक अवघ्या १७८ शेतकऱ्यांनी माती, तर २४ जणांनी पाणीपरीक्षण केले आहे.