Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’मधील पदव्‍युत्तरच्या विद्यार्थ्यांनो, गृहपाठ सादर करा! मुक्‍त विद्यापीठाच्‍या सूचना

Nashik YCMOU : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या पदव्‍युत्तर शिक्षणक्रमाच्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हस्‍तलिखित गृहपाठ सादर करावा लागणार आहे.
YCMOU nashik
YCMOU nashikesakal

Nashik YCMOU News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या पदव्‍युत्तर शिक्षणक्रमाच्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हस्‍तलिखित गृहपाठ सादर करावा लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करत विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. त्‍यासाठी शनिवार (ता. २७) पर्यंत मुदत दिलेली आहे. मुक्‍त विद्यापीठातर्फे गृहपाठ सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना सूचना जारी केल्‍या आहेत. (Nashik YCMOU Post Graduate Students in Mukt Submit Homework announced by Mukt University Instructions marathi News)

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी स्‍वलिखित गृहपाठ विद्यापीठाला येत्‍या शनिवार (ता.२७) पर्यंत संकेतस्‍थळावर अपलोड करायचा आहे. तर अभ्यासकेंद्रांनी ते समंत्रकांकडून ऑनलाइन पद्धतीने १० मेपर्यंत तपासून पूर्ण करण्याबाबत सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्‍या शिक्षणक्रमाच्‍या गृहपाठाच्‍या ३० गुणांच्‍या चार क्रेडिट पॉइंट्‌ससाठी दोन्‍ही असाईनमेंट एकत्रित सोडवायच्‍या आहेत.

क्षेत्रातील कार्यासाठी संकेतस्‍थळावरील सूचनांप्रमाणे ऑफलाइन स्‍वरुपातील कारवाई करायची आहे. गृहपाठ सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. सोळा अंकी पीआरएन क्रमांकाचा उपयोग करुन तसेच युझर गाईड काळजीपूर्वक अभ्यासून नोंदणी करण्याचे सुचविले आहे. गृहपाठ लेखणासंदर्भातील विविध सूचना या परिपत्रकामध्ये नमूद केल्‍या आहेत.

या अभ्यासक्रमाच्‍या विद्यार्थ्यांना सादर करावा लागणार गृहपाठ-

वाणिज्‍य शाखेतील एम.कॉम. तसेच कला शाखेतील एमए अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण, उर्दू, मराठी, अर्थशास्‍त्र, पब्लिक ॲडमिनिस्‍ट्रेशन, हिंदी, इतिहास, गणित, पर्यावरण विज्ञान, भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, वनस्‍पतीशास्‍त्र, प्राणीशास्‍त्र यासह एमबीए या शिक्षणक्रमांच्‍या प्रथम वर्षाच्‍या द्वितीय सत्रासाठी नियमित प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना गृहपाठ सादर करावा लागेल. (latest marathi news)

YCMOU nashik
YCMOU News : पुनर्परीक्षार्थींना अर्जाची ‘मुक्‍त’कडून 22 पर्यंत मुदत

गृहपाठासंदर्भातील महत्त्वाच्‍या सूचना अशा-

- गृहपाठ अपलोड करताना विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी नमूद करायचा आहे.

- प्रश्‍नाचे उत्तर लिहिताना प्रत्‍येक प्रश्‍नासाठी किमान ५०-६० शब्‍दांत उत्तर अपेक्षित

- प्रत्‍येक प्रश्‍न स्‍वतंत्र पानावर लिहायचा आहे. जास्‍तीत जास्‍त ४-५ पानांत गृहपाठ करावा.

- प्रश्‍नाचे उत्तर क्रमवारच सोडवावे. शक्‍यतो एका पानातच प्रश्‍नाचे उत्तर उरकावे.

- गृहपाठाची पीडीएफ तयार करताना सुस्‍पष्ट स्‍कॅन वाचनीय असावी.

- प्रत्‍येक पानाचे साईज ३ एमबी आणि सर्व पाने मिळून जास्‍तीत जास्‍त २० एमबी असावे.

- विषयनिहाय प्रत्‍येकी एक पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावी.

- सर्व विषयांचे गृहपाठ अपलोड करण्यासाठी २७ एप्रिलच्‍या रात्री ११ पर्यंत मुदत

- अस्‍वीकृत (रिजेक्‍ट) झालेले गृहपाठ पुन्‍हा सादरीकरणासाठी उपलब्‍ध होतील.

- गृहपाठासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांच्‍या प्रोफाईलला, ईमेलवर कळविली जाईल.

YCMOU nashik
Nashik YCMOU Admission : मुक्‍तच्‍या कृषी अभ्यासक्रमाच्या अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या वेळापत्रक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com