Akshaya Tritiya 2024 : येवल्यात अक्षय तृतीयेच्या बाजाराला झळाळी

Nashik News : अक्षय तृतीयेच्या पुजेसाठीच्या करा-केळींचा येथे बाजार भरला आहे. आज शनी पटांगणासह बाजारपेठ करा-केळी व आंब्याने फुलली होती.
Pottery for sale in the market
Pottery for sale in the marketesakal

येवला : अक्षय तृतीयेच्या पुजेसाठीच्या करा-केळींचा येथे बाजार भरला आहे. आज शनी पटांगणासह बाजारपेठ करा-केळी व आंब्याने फुलली होती. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेतही उत्साह होता. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या यादिवशी जे काही केले जाते ते अक्षय टिकते. (yeola market for Akshaya Tritiya puja)

या मान्यतेमुळे हिंदू धर्मात महत्त्व असल्याने पूर्वंजाचे श्रध्देने पूजन होते. मातीच्या भांड्यात आंबा ठेवून पूजा करण्याच्या प्रथेमुळे दरवर्षी नव्या करा-केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो. बाजारात लहान व मोठ्या प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. मोठ्या करा-केळी ७० ते १०० रुपये तर लहान ४० ते ६० रुपये किमतीत विक्री होत होती. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हापूस व केशर आंब्यांना नागरिकांची मोठी पसंती होती.

आंबे १०० ते १५० रुपये दराने मिळत असून केशरला १५० ते २०० सर्वाधिक मागणी आहे.अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने काही प्रमाणात या आंब्याची आवक घटल्याने आंब्यांच्या दरात वाढ झाली आहेत. यामुळे अक्षय तृतीयेच्या आंबे खरेदीची नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. (latest marathi news)

Pottery for sale in the market
Nashik Unseasonal rain News : नांदुरी, सप्तशृंगगड परिसरास वादळासह पावसाने झोडपले

मातीच्या वस्तूंना महत्त्व

कुंभार समाज हा खापर, कोलमे, चूल,पारंपरिक गाडगी,मडकी,माठ,रांजण, गणपती,लक्ष्मी व सणासुदीला लागणाऱ्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो. कारागिरांनी उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी लागणारे उन्हाळी माठ,रांजण इतर वस्तू बनवून ठेवले. कुंभार कारागिरांचा वर्षभर कुटुंब चरितार्थ चालतो. उन्हाळ्यामुळे माठ व अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी लागणारे माठ अर्थातच करा-केळीला मागणी वाढली आहे.सणामुळे कुंभार बांधवांना काहीसा फायदा होत आहे.

"उन्हाळ्यात मातीच्या माठांना चांगली मागणी आहे. अनेक नागरिक आता फ्रिज ऐवजी माठाला नैसर्गिक पाण्यासाठी पसंती देतात. अक्षय तृतीयेला करा-केळी घरोघरी पूजली जाते. त्यामुळे या निमित्ताने कारागिरांना मातीचे साहित्य विक्रीला संधी मिळत आहे. मातीसह बनविण्याचा खर्च वाढला असला तरी दर मात्र सर्वसाधारणच आहेत." -कृष्णा सोनवणे (जिल्हाध्यक्ष,कुंभार समाज विकास संस्था)

Pottery for sale in the market
Nashik News : खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com