Nashik News : बसअभावी विद्यार्थ्यांची 6 किलोमीटर पायपीट! खराब रस्त्यामुळे 70 विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न

Nashik News : शाळाप्रवेशाचा गावोगाव उत्सव साजरा होत असतांना येवला तालुक्यातील महालखेडा येथील ७० ते ८० विद्यार्थी वेळेवर बस नसल्याने शाळेला येऊ शकत नाही.
Yeola Students walk 6 kilometers for lack of bus service
Yeola Students walk 6 kilometers for lack of bus serviceesakal

चिचोंडी : शाळाप्रवेशाचा गावोगाव उत्सव साजरा होत असतांना येवला तालुक्यातील महालखेडा येथील ७० ते ८० विद्यार्थी वेळेवर बस नसल्याने शाळेला येऊ शकत नाही. रस्ते खराब असल्याने येवला आगाराची महालखेडा ही बस सकाळी दहाची बस बंद झाल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला एक प्रकारे ब्रेक लागला आहे. (Yeola Students walk 6 kilometers for lack of bus service)

येवला आगाराच्या बस रस्ता खराब असल्याचा कारणाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पाटावर थांबून माघारी फिरतात. सकाळी दहाला येणारी बस बंद केल्याने या बस मधून चिचोंडी येथे विद्यालयात ७० ते ८० विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांची मोठीच गैरसोय झाली आहे.

बस बंद असल्याने काही मुले सायकल वर येतात. बसअभावी पाच ते सहा किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने अनेक पालकांनी मुलींचे शिक्षण थांबवले आहे. बस नसल्याने विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे बस सुरू करावी अशी मागणी राजू शिंगाडे, प्रशांत बोराडे, योगेश होंडे, भागचंद नागरे, अनिल खांडेकर यांनी केली आहे. (latest marathi news)

Yeola Students walk 6 kilometers for lack of bus service
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

"बस अभावी आमच्या गावातील मुली भिंगारे फाटा येथे पायी जातात. रस्त्यात वाढलेल्या काटेरी बाभळी, बिबट्याचे नियमित होणारे दर्शन यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना भीती वाटते." - राजू शिंगाडे, पालक, महालखेडा (ता.येवला)

"येवला आगारात बसची संख्या अपुरी असल्याने तसेच महालखेडा रस्ता खराब असल्याने सकाळी दहाची बस चार वर्षापासून बंद केली आहे. येवला आगारास नवीन बस प्राप्त झाल्यावर लगेच महालखेडा बस सुरू केली जाईल." - नारायण भागवत, आगार प्रमुख, येवला

Yeola Students walk 6 kilometers for lack of bus service
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com