esakal | Yevla: तालुक्यात मुसळधार, उरल्यासुरल्या पिकांची धूळधाण
sakal

बोलून बातमी शोधा

तालुक्यात मुसळधार, उरल्यासुरल्या पिकांची धूळधाण

येवला : तालुक्यात मुसळधार, उरल्यासुरल्या पिकांची धूळधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.कातरणी,नेऊरगाव येथे तर ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने उरल्यासुरल्या पिकांची धूळधाण उडाली आहे.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चिचोंडी, साताळी, निमगाव मढ, एरंडगाव, रायते, बदापूर, जळगाव नेऊर, नेऊरगाव, देशमाने मुखेड आदि ठिकाणी १ तासापेक्षा अधिक वेळ हस्त.नक्षत्राच्या मुसळधार सरी बरसल्या.नेऊरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.नेऊरगाव येथील गाय नदीला पूर आला आहे व या नदीवर बांधण्यात आलेला बंधारा या पूरात फूटून गेला आहे.नेऊरगाव ते साताळी,भिगारा,

हेही वाचा: मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अडथळा दूर

चिचोडी,रवंदा या गावाचा जान्यासाठी संपर्क बंद झाला होता.शहर व परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. तर तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल,नागडे,धामणगाव येथे अर्धा तास मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या.तालुक्यात एक आठवडयापूर्वीच मुसळधार पाऊसाने शेतीचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.त्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारातील पिकांमध्ये पाणीच पाणी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने शेतातील मका,सोयाबीन,भुईमुग,कांदा,द्राक्ष तसेच उन्हाळ कांदा रोपे याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

कातरणी येथे शुक्रवारी झालेल्या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही धुळधान झाली असून शेतकऱ्यांच्या सर्व आशा मावळल्या आहेत.पहिल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतात न होतात तोच काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कातरणीत हाहाकार माजवला.पावसाने उभ्या पिकांसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या आहेत.तासापेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने उच्छाद मांडल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती.चारपाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कातरणी येथे नुकसान झाले शुक्रवारी बझालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः वाहून गेल्या असून अजूनही पंचनाम्याना सुरवात देखील झालेली नाही.

हेही वाचा: चिचोंडी : नको नको रे पावसा...अंत आता पाहू...पावसाचा रुद्रावतार

"येथे व परिसरातील पावसाने भयानक नुकसान झाले असून अक्षरशः जमिनी वाहून गेल्या आहेत.नुकसान होऊन आठ दिवस होत आले तरीही अजून पंचनाम्याना सुरवात झालेली नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून निसर्गाने कोट्यवधीचे नुकसान केले आहे."

-योगेश पाटील,उपसरपंच,कातरणी

"नेऊरगाव येथे ढगफुटीसारखा पाऊस झाला.या मुसळधार पावसाने द्रा‌क्ष,टमाटे, मिरचीचे लाखोंचे नुकसान केलेच पण ऊन्हाळ कांदा रोप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गाय नदीवर बांधण्यात आलेला बंधारा या पूरात फूटून पाणी वाहिल्याने याचाही फटका शेतकऱ्यांना बसला."

-विनोद कदम,नेऊरगाव

loading image
go to top