Nashik News : मेंढपाळ तरुणाची उद्योग व्यवसायात भरारी! नगरसुलच्या बाबूराव वऱ्हेंनी उभारला गव्हाणी निर्मितीचा उद्योग

Nashik News : तरुण बाबुराव चांगदेव वऱ्हे याने अंगी असलेले कौशल्य, कल्पकता, कष्ट व मेहनतीची जोड देऊन स्वतःच्या शेतातच ‘जय मल्हार गव्हाणी’ निर्मितीचे वर्कशॉप उभारले आहे.
Baburao Varhe set up Industry for manufacture of useful thoughts for storing feed and water for goats and sheep
Baburao Varhe set up Industry for manufacture of useful thoughts for storing feed and water for goats and sheepesakal

नगरसूल : येथील मूळचा व्यवसायाने मेंढपाळ असणारा तरुण बाबुराव चांगदेव वऱ्हे याने अंगी असलेले कौशल्य, कल्पकता, कष्ट व मेहनतीची जोड देऊन स्वतःच्या शेतातच ‘जय मल्हार गव्हाणी’ निर्मितीचे वर्कशॉप उभारले आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी खाद्य व पाणी ठेवण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त गव्हाणी निर्मितीचा उद्योग उभारला असून, गव्हाणी खरेदीसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Nashik News)

त्यामुळे ते हजारो बेरोजगार तरुणांना प्रेरणादायी ठरले आहे. बाबूराव वऱ्हे हे स्वतः अल्पशिक्षित आहेत. त्यांनी कोठेही यांत्रिक प्रशिक्षण न घेता अंगीभूत कौशल्याचा वापर करून शेळ्या-मेंढ्यांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या साईजच्या उत्कृष्ट व उपयोगी गव्हाणी ते स्वतः तयार करतात. ऐन दुष्काळातही मोठी आर्थिक उलाढाल व परिवारासाठी उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे.

पाच वर्षापासून सुरू केलेल्या या गव्हाणी निर्मिती उद्योगात त्यांना त्यांची मुले मयूर, रोशन, पत्नी रंजना, आई जिजाबाई, वडील चांगदेव वऱ्हे यांचीही खंबीर साथ मिळत आहे. यासोबतच मेंढ्यांची लोहकर कापण्यासाठी लागणारे अत्याधुनिक कटिंग मशीन यंत्र, मेंढपाळांसाठी आवश्यक असणाऱ्या घोंगड्या ते माफक दरात उपलब्ध करून देत आहेत.

त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याने त्यांच्या व्यवसायाने अल्पावधीतच भरारी घेतली आहे. इंजिनिअरिंग किंवा तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आदींबाबत उच्च शिक्षण घेऊनही नोकरी व्यवसाय नसलेल्या तरुणांसाठी एक आदर्श बाबुराव वऱ्हे यांनी निर्माण केला आहे. (latest marathi news)

Baburao Varhe set up Industry for manufacture of useful thoughts for storing feed and water for goats and sheep
Nashik News : महापालिकेसह स्मार्टसिटी कंपनी, जिल्हाधिकाऱ्यांना अवमान नोटीस!

येवला तालुक्याचा परिसर व बाहेरील जिल्ह्यातील दूरदूरचे पशुपालक, मेंढपाळ, शेतकरी वऱ्हे यांच्या वर्कशॉपला भेटी देत असून, साहित्य खरेदी करीत आहे. गव्हाणी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कटके वस्ती रोड, नगरसूल (ता. येवला) येथे अवश्य भेट द्यावी, असे आवाहन बाबुराव वरे यांनी केले आहे.

"सुरुवातीला मेंढपाळ व्यवसाय करीत असताना या गव्हाणीची आवश्यकता भासली. त्यातूनच हा निर्मिती व्यवसाय सुरू केला. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे समाधान वाटते." - बाबूराव वऱ्हे, नगरसूल

Baburao Varhe set up Industry for manufacture of useful thoughts for storing feed and water for goats and sheep
Nashik NMC News : अस्वच्छता करणाऱ्या 980 नागरिकांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com