Shiv Jayanti 2024: शिव जयंतीनिमित्त युवकांचा उत्साह शिगेला! इगतपुरी-घोटीच्या बाजारपेठेत भगवे झेंडे, इतर साहित्यांची रेलचेल

Shiv Janmotsav 2024 : इगतपुरी-घोटी शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यास सुरवात झाली आहे.
flags for sale on the Mumbai-Agra Mahamaharag. Shops have been decorated with various materials and attractive statues have also been introduced.
flags for sale on the Mumbai-Agra Mahamaharag. Shops have been decorated with various materials and attractive statues have also been introduced.esakal

Shiv Jayanti 2024 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी (ता. १९ ) साजरी होणाऱ्या जयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून, इगतपुरी-घोटी शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील विविध संघटनांसह तरुणांनीही विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

शिव जयंतीच्या (Shiv Jayanti) पार्श्वभूमीवर घोटी व इगतपुरी शहरातील बाजारपेठेत भगवे ध्वज, टोप्यांसह विविध प्रकारचे टॅटू, लहान व मोठ्या आकाराचे ध्वज, मोटारसायकल व चारचाकी वाहनांना लावण्यासाठी लहान आकाराचे भगवे ध्वज, शर्टला लावण्यासाठी बॅच, महाराजांचा फोटो असलेले स्टीकर, गळ्यातील मफलर आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. (nashik Shiv Jayanti 2024 igatpuri Ghoti market marathi news)

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात शिव जयंतीचा उत्साह अधिक दिसून येत आहे. तालुक्याच्या विविध भागातील विविध मंडळांच्या शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने गावागावांतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समितीतर्फे देण्यात आली.

इगतपुरी-घोटी शहरासह तालुक्याच्या विविध भागांत शिव जयंतीच्या तयारीला वेग आला आहे. येत्या सोमवारी शिव जयंती साजरी होणार असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताका व इतर साहित्यांची रेलचेल असून, सोबतच शिवाजी महाराजांचा पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. बाजारपेठेसह मुंबई-आग्रा महामार्गासह चौकाचौकांत शिव जयंतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे. (Latest Marathi News)

flags for sale on the Mumbai-Agra Mahamaharag. Shops have been decorated with various materials and attractive statues have also been introduced.
Shiv Jayanti 2024 : पंचवटी शिवजन्मोत्सव समितीकडून अयोध्या राममंदिराची भव्य प्रतिकृती

उत्साहाचे वातावरण

इगतपुरी तालुक्यात सेनेचा चांगल्या प्रकारे प्रभाव आहे. इगतपुरी शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून सेनेची सत्ता आहे. तसेच तालुक्याच्या विविध गावांतही प्रभाव असल्याने शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंतीनिमित्त तालुक्यातील नांदगाव सदो, टाकेद, बोरटेंभे, टिटोली, इगतपुरी शहर, घोटी, गोंदेदुमाला, देवळे आदी भागांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

flags for sale on the Mumbai-Agra Mahamaharag. Shops have been decorated with various materials and attractive statues have also been introduced.
Shiv Jayanti 2024 : शिवनेरी संग्रहालय आणि बालसंस्कार सृष्टीची शिवजयंतीला होणार घोषणा; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com