Nashik Crime News : नाशिकच्या तरुणाचा वणीत खून; 6 तासात ग्रामीण पोलिसांकडून तपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : नाशिकच्या तरुणाचा वणीत खून; 6 तासात ग्रामीण पोलिसांकडून तपास

नाशिक : नाशिक शहरातील एकाच वणी बसस्थानकात झालेल्या खुनाचा सहा तासात वणी पोलिसांनी तपास करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. विनोद ऊर्फ रॉक मधुकर मोरे असे खून झालेल्या संशयितांचे नाव आहे.

मृत विनोद नाशिकला पाथर्डी शिवारात रहायला असून तो काल (ता.२) दिंडोरी येथे गेला होता. वणीला रात्री मित्रांसोबत पार्टी केली.पार्टीत त्यांच्यात रात्री उशिरा बसस्थानक परिसरात वाद झाला. त्यातून खून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. (Nashik youth killed in vani Investigation by rural police in 6 hours Nashik Crime News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मृत विनोद मोरे याच्या डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत सकाळी बसस्थानक परिसरात मृतदेह आढळला होता. स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या सहकार्याने नाशिकच्या एका संशयितास पकडले.

उर्वरित दोन संशयितांच्या मुसक्या वणी पोलिसांनी आवळल्या. ग्रामीण पोलिसांनी चार संशयिताना जेरबंद केले. छोटू ऊर्फ हरीश काळुराम प्रजापती, दीपक गायकवाड, मतीन आयास काझी (भारतनगर, वडाळा शिवार) यांच्या विरोधात मृत विनोदची पत्नी मंगल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका फरार संशयिताचा शोध सुरू आहे.