Nashik News : जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेला 2 कोटींचा नफा

Nashik News : जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ कोटी ३ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रमोद ठाकरे यांनी दिली.
Nashik Zilla Gramsevak Credit Union profit of 2 crore
Nashik Zilla Gramsevak Credit Union profit of 2 croreesakal

Nashik News : जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ कोटी ३ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रमोद ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वात कमी ७ टक्के व्याजदराने सभासदांना कर्जपुरवठा करणारी व सभासदांना ५.५० टक्के लाभांश वाटप करणारी अग्रगण्य पतसंस्थेची शहरात ग्रामसेवक भवन वास्तू असून संस्थेचे एकूण एक हजार १३० सभासद आहे. (Nashik Zilla Gramsevak Credit Union profit of 2 crore)

संस्थेची कर्ज मर्यादा १३ लाख असून, आकस्मित कर्ज मर्यादा तीस हजार आहे. या संस्थेचे खेळते भागभांडवल ३९ कोटी १६ लाख असून, कर्जवाटप १३ कोटी २९ लाख केले आहे. तसेच कर्ज वसूल १० कोटी ३७ लाख झाली आहे. पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २ कोटी ३ लाखांचा नफा झाला आहे, थकबाकीचे प्रमाण ०. ८१ टक्के आहे.

संस्थेने प्रत्येक सभासदांचा वैयक्तीक एक लाखाचा विमा व ग्रुप अपघाती विमा १५ लाखांचा उतरविण्यात आला आहे. तसेच संस्थेने आर्थिक वर्षात २ कोटी ४१ लाख ६३ हजार रुपये स्टेट बँकेत ठेवीमध्ये गुंतवणूक केली आहे. (Latest Marathi News)

Nashik Zilla Gramsevak Credit Union profit of 2 crore
Nashik NMC News : एकीकडे निवडणुका, दुसरीकडे खोदकाम; वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा देण्यासाठी 15 मे ‘डेडलाईन’

संस्थेचे राज्य मानद अध्यक्ष कैलास वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने पारदर्शक व स्वच्छ कारभार केल्याने संस्थेने वाचनालय, भव्य पतसंस्था कार्यालय, भव्य सभागृह, अतिथिगृह, प्रशिक्षण वर्ग व भव्य गार्डन, मंदिर, रुग्णवाहिका आदी सुविधा सभासदांना दिल्या आहे.

संस्थेचे कामकाज संगणकीकृत असून सभासदांना मोफत एसएमएस सुविधा व एक नविन अॅप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे व्हाइस चेअरमन दत्तात्रेय गायकवाड, चिटणीस राजेंद्र जाधव, मानद सचिव नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.

Nashik Zilla Gramsevak Credit Union profit of 2 crore
Nashik Water Shortage : टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अघोषित पाणीकपात; शहरात प्रतिनागरिक सव्वाशे लिटर पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com