Nashik Water Scarcity : टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले

Nashik News : टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे गटविकास अधिकाऱ्यांची पाणी व चाराटंचाई आढावा बैठक घेतली.
Chief Executive Officer Ashima Mittal reviewing the shortage through television system in Zilla Parishad.
Chief Executive Officer Ashima Mittal reviewing the shortage through television system in Zilla Parishad.esakal

Nashik News : जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता वाढत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने वेळोवेळी निदर्शनास आणले. त्यानंतर जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी (ता. ८) दूरदृश्य प्रणालीद्वारे गटविकास अधिकाऱ्यांची पाणी व चाराटंचाई आढावा बैठक घेतली. (Nashik Water Scarcity)

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी कळवण-सुरगाणा तालुक्याची टंचाई आढावा बैठक कळवण पंचायत समितीत घेतली.

टंचाई आराखडे तयार करा : आशिमा मित्तल

भीषण पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी. सद्यःस्थितीत असलेली पाणीटंचाई व संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना मित्तल यांनी केल्या. जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी.

ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, पशुधन विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, वैशाली ठाकरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अबोली सताळकर यांसह तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, तालुका पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळसदृश परिस्थिती असणाऱ्या गावांची पाहणी करून या गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी पर्यायी व्यवस्था कशी करता येईल, याबाबत लक्ष द्यावे. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करावे, ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे, त्या गावांच्या टँकर मागणीच्या प्रस्तावांबाबत त्वरित पाठपुरावा करून गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. (latest marathi news)

Chief Executive Officer Ashima Mittal reviewing the shortage through television system in Zilla Parishad.
Nashik News : खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार

असे निर्देश मित्तल यांनी दिले. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, ती तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. चाराटंचाईबाबत आढावा घेताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नाशिक तालुक्यांत मेअखेर पुरेल इतका चारासाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत चारा उपलब्धतेबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांना तालुका भेट देऊन बैठक घेण्याच्या सूचनाही मित्तल यांनी केल्या.

वस्तुस्थिती जाणून तत्काळ टॅंकर मंजूर करावे : डॉ. गुंडे

पाण्याची टंचाई वाढत असून, टॅंकरची मागणी वाढत आहे. यासाठी टॅंकर मागणी आलेल्या गावात गटविकास अधिकारी अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी. टॅंकरचा प्रस्ताव सादर करावा. सादर झालेला टॅंकरचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्यात यावा, असे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी दिले.

Chief Executive Officer Ashima Mittal reviewing the shortage through television system in Zilla Parishad.
Nashik Unseasonal Rain News : अवकाळी, वादळी पावसाने मोसम खोऱ्यामध्ये मोठी हानी

कळवण तालुक्यातील पाणी व चाराटंचाईचा गटविकास अधिकारी नीलेश पाटील यांनी, तर सुरगाणा तालुक्यातील टंचाई, टॅंकरचा सविस्तर आढावा गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी सादर केला. सुरगाणा तालुक्यात टॅंकरची संख्या वाढत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन गावातील पाणीटंचाईचा आढावा घ्यावा. टॅंकर मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थितीसाठी क्षेत्रीय पाहणी करून अहवाल मागवून घ्यावेत.

प्राप्त झालेले टॅंकर मागणीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत, अशा सूचना डॉ. गुंडे यांनी या वेळी दिल्या. याशिवाय जलजीवन मिशन अतंर्गत पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण कराव्यात, पाढर तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. रोजगार हमी योजनेचाही आढावा या वेळी झाला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, बांधकाम कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chief Executive Officer Ashima Mittal reviewing the shortage through television system in Zilla Parishad.
Nashik News : डॉ. तुषार शेवाळे यांची कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com