नाशिक: जिल्हा परिषदेतील सेस निधीचे नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हे नियोजन त्वरित रोखले आहे. या नियोजनातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सीईओ मित्तल यांनी दिली.