
नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताच जिल्हा परिषद प्रशासनही ॲक्टिव्ह झाले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्येक अधिकाऱ्यास एका तालुक्याचे ‘पालकत्व’ दिले आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी तालुक्याची आढावा बैठक घेण्याची सूचना त्यांनी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी तालुका पालक अधिकारी यांची यादी सुधारित केली.