नाशिक: सलग सुट्यांमुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांच्या अंतिम प्रारूपाच्या प्रसिद्धीला अखेर मुहूर्त लागला आहे. पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी (ता. २२) पंधराही तालुक्यांत अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अंतिम प्रारूपनुसार जिल्ह्यात ७४ गट आणि १४८ गण असणार आहेत. प्रारूप प्रसिद्धीमुळे इच्छुकांनी निवडणूक प्रचाराचा पोळा फोडला.