
नाशिक : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या शासकीय कन्या शाळेने सुचविलेल्या दुरुस्तीच्या कामांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने फेटाळला आहे. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता रजेवर असल्याने त्यांच्या परवानगीनेच हा प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २७) सर्वसाधारण व स्थायी समितीची सभा पार पडली.