Nashik ZP News : दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी 19 एप्रिलचा अल्टिमेटम! 609 पैकी 198 कर्मचाऱ्यांची पडताळणीकडे पाठ

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीसाठी सामान्य प्रशासनाने पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीसाठी सामान्य प्रशासनाने पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. एकूण ६०९ कर्मचाऱ्यांपैकी ४११ कर्मचाऱ्यांनी पडताळणी (यूडीआयडी-दिव्यांग ओळखपत्र) काढले आहेत. १९८ कर्मचाऱ्यांनी अद्यापही पडताळणी केली नाही. यात सर्वाधिक शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना १९ एप्रिलची डेटलाइन दिली आहे. (Nashik ZP April 19 ultimatum for disability certificate verification news)

दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना पत्र काढून पडताळणी करण्याचे निर्देश दिले.

त्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या आदेशाला विभागांकडून केराची टोपली दाखविण्यात आली. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीस टाळाटाळ केली जात असल्याची ओरड सुरू झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पत्र काढत पडताळणीचे निर्देश दिले.

याच पार्श्वभूमीवर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवारी (ता. १५) विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत मित्तल यांनी विभागनिहाय दिव्यांग कर्मचारी पडताळणीचा आढावा घेतला. यात, अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी अद्यापही झालेली नसल्याचे निर्देशनास आले.

यातही शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांच्या पडताळणीची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यावर मित्तल यांनी सायंकाळपर्यंत लागलीच सर्व विभागांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लागलीच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक यांची बैठक घेत एकूण दिव्यांग कर्मचारी, प्रमाणपत्रधारक कर्मचारी व यूडीआयडी न काढलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली.

मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण १८ हजार ६६८ मंजूर पदांपैकी १५ हजार ११३ पदे भरलेली आहेत. यातील ६०९ कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर यातील ४११ कर्मचाऱ्यांनी पडताळणी करत, यूडीआयडी क्रमांक काढला आहे. १९८ कर्मचाऱ्यांनी हा क्रमांक काढलेला नाही. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik ZP Staff Transfers : निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या! सामान्य प्रशासन विभागाकडून तयारी सुरू

यात सर्वाधिक १४८ शिक्षकांचा समावेश आहे. यूडीआयडी न काढलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने १९ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत ऑनलाइन क्रमांक काढण्याचे निर्देश दिले आहेत. जे कर्मचारी मुदतीत पडताळणी करणार नाहीत, त्यांचे प्रमाणपत्र बोगस धरले जाईल, असा इशारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांना या वेळी दिला.

विभाग दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या दिव्यांग प्रमाणपत्रधारक यूडीआयडी प्रमाणपत्र

असलेले कर्मचारी नसलेले कर्मचारी

सामान्य प्रशासन ५२ ५२ ४० १२

आरोग्य ६४ ६४ ४९ १५

कृषी १ १ १ ०

ग्रामपंचायत ५३ ५३ ३९ १४

प्राथमिक शिक्षण ४११ ४११ २६३ १४८

बांधकाम (१, २, ३) ४ ४ ३ १

लेखा व वित्त ३ ३ ३ ०

पशुसंवर्धन १२ १२ १० २

ग्रामीण पाणीपुरवठा १ १ ० १

महिला व बालकल्याण ८ ८ ३ ५

Nashik ZP News
Nashik ZP School : भरतीनंतरही जि. प. शाळांत शिक्षकांची 912 पदे रिक्तच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com