Nashik ZP Staff Transfers : निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या! सामान्य प्रशासन विभागाकडून तयारी सुरू

Nashik News : लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला असल्याने त्यानंतर या बदल्यांना मुहूर्त लागणार आहे
Nashik ZP
Nashik ZPesakal

Nashik ZP Staff Transfers : लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. ३१ मेअखेरची सेवा गृहीत धरून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ एप्रिलपर्यंत याबाबतची माहिती भरावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला असल्याने त्यानंतर या बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. (nashik ZP Staff Transfers after election results news)

दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जात असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असते. गत वर्षीची मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कर्मचारी बदलीप्रक्रिया पार पडली होती. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी हा महिना ते दीड महिना लांबणीवर पडणार आहे.

४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच बदल्या होणार आहेत. मात्र, तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ५ एप्रिलला सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले आहे.

२१ तारखेपर्यंत माहिती सादर करणार, सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून संवर्गनिहाय एकत्रित करून ती अद्ययावत करण्यात येणार आहे. यातून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी सेवाज्येष्ठता आणि संवर्गनिहाय तयार करावयाची व ज्या कर्मचाऱ्यांच्या कार्यरत ठिकाणी तीन वर्षे वा त्यापेक्षा जास्त सेवा कालावधी झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय स्वतंत्र वास्तव सेवाज्येष्ठता यादी असणे आवश्यक आहे.

त्यासाठी ३१ मेपर्यंतची सेवा गृहीत धरून सेवाज्येष्ठता धरली जाणार आहे. पती-पत्नी एकत्रिकरणाच्या दृष्टीने विनंती केल्यास त्यांच्या सेवाविषयी म्हणजेच पती-पत्नी कोठे केव्हापासून सेवेत आहेत, ही माहिती नमूद करावी. याशिवाय अपंग, विधवा, परितक्त्या, सैनिकांच्या पत्नी, गतिमंद मुलांचे पालक, दुर्धर आजार या सर्व बाबी नमूद करणे आवश्यक ठरणार आहे. परिपूर्ण भरलेली माहिती २१ एप्रिलपूर्वी विषय सहाय्यकाने सामान्य प्रशासन विभागात संबंधित विषय लिपिकाकडे सादर करावयाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांच्याही ऑनलाइन बदल्या

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबत शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. त्यासाठीचीही प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीमुळे यंदा बदल्या होणार नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मतदान २० मेस होणार आहे. त्यानंतर आचारसंहिता शिथिल होणार किंवा कसे, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे ४ जूननंतरच बदलीचे आदेश निघू शकतात. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik ZP Digital School : शाळांचे डिजिटलायझेशन, रंगकाम पेंटरांच्या पथ्थ्यावर! जिल्ह्यातील कामांमुळे मिळतो रोजगार

दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी

गत वर्षी बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्रे दिल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तसेच दोन महिन्यांपूर्वी ग्रामविकास अधिकारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत बदली केली. यात त्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने सर्व विभागांना दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

यात, सामान्य प्रशासन विभाग स्वतः या प्रमाणपत्राची पडताळणी करणार आहे. याबाबतची कार्यवाही सुरू आहे. बदल्यांमध्ये सूट घेताना बनावटगिरी होऊ नये, यासाठी खातेप्रमुखांनी आपल्या स्तरावर आधिच प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी असेल बदल्यांची तयारी

- तालुका व विभागांकडून सेवाज्येष्ठता यादी पाठविणे : १२ एप्रिल ते २० एप्रिल २०२४

- सेवाज्येष्ठता यादी तयार करणे : २० एप्रिल २०२४

- ज्येष्ठता यादीवर हरकती, आक्षेप घेणे : २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४

- हरकतींचे निराकरण करून अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध : १ मे ते १० मे २०२४

- बदलीसाठी विकल्प, विनंती अर्ज सादर करणे : २१ एप्रिल २०२४

Nashik ZP
Nashik ZP School : भरतीनंतरही जि. प. शाळांत शिक्षकांची 912 पदे रिक्तच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com