तुषार माघाडे : नाशिक- एका अभियंता महिलेला व्हॉटसॲपवर ‘एपीके’ फाइल आली. त्यांनी ती डाऊनलोड करून ॲप इन्स्टॉल केले. त्या ॲपला एका क्लिकवर सर्व परमिशन दिली आणि एका झटक्यात त्या महिलेच्या खात्यावरून दहा लाखाची रक्कम गायब झाली. अशीच घटना एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत घडली. एका ठिकाणी एका ग्रुपवर आलेल्या ‘एपीके’ फाइलमुळे अनेकांचे व्हॉटसॲप हॅक होऊन त्यांच्या क्रमांकावरून अश्लील छायाचित्र ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’ मधल्या लोकांना जाऊ लागले.