नाशिक- येथे पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनावर बुधवारी (ता. २३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. आदिवासी आमदार थेट आदिवासी विकासमंत्र्यांना भेटून हा विषय मार्गी लावण्याचा आग्रह करणार असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलकांना सांगितले. दरम्यान, आंदोलक तुळशीराम खोटरे यांची प्रकृती खालावल्याने तपासणी करण्यात आली.