नाशिक- देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील ‘टीडीआर’ घोटाळ्याची शासनाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश देताना २०२० मध्ये महापालिकेने नियुक्ती केलेल्या चौकशी समितीने दिलेली क्लीन चीटदेखील चर्चेत आली आहे.समितीने कुठल्या आधारे क्लीन चीट दिली, याची चौकशी करण्याचे आदेशदेखील समितीला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत शासन नियुक्ती अधिकाऱ्यांची कारकीर्द वादात सापडली आहे.