दिंडोरी- तालुक्यातील तळेगाव, दिंडोरी आणि परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरी वस्तीत धुमाकूळ घातला आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओझर विमानतळावर भेट घेऊन उपाययोजना करण्याचे गाऱ्हाणे घातले.