सिडको- नाशिक शहरातील इंदिरानगर बोगद्याजवळील चौकात गुरुवारी (ता. १५) रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घालत ‘महाराष्ट्र पोलिस काय करतील बघते मी’ असे म्हणत नागरिकांना आणि पोलिस यंत्रणेला थेट आव्हान दिल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.