नाशिक- रामतीर्थावरील धार्मिक विधींचे सारथ्य करणाऱ्या श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या अध्यक्षपदावरून चार दिवसांपासून वाद पेटला आहे. याबाबत शनिवारी (ता.७) सतीश शुक्ल यांनी अध्यक्षपदी निवड झालेल्या चंद्रशेखर पंचाक्षरी यांना वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीशीत विद्यमान अध्यक्षांच्या संमतीविना व पुरेसे विश्वस्त उपस्थित नसतानाही बेकायदा सभा घेऊन काही ठराव पारित केल्याचे सांगत बदनामीबाबत दिवाणी व फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.