नाशिक- मुंढेगाव (ता.इगतपुरी) येथील जिंदाल पॉलीफिल्म्स या कंपनीच्या पीपी युनिट व पॉलीस्टर युनिटला लागलेल्या आगीने भयंकर रुप धारण केले आहे. बुधवारी (ता.२१) मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या या आगीला ३६ तास उलटूनही अद्यापपर्यंत आग विझलेली नाही. आग पूर्णपणे विझविण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिंदाल कंपनीपासून १ किलोमीटरचा परिसर रिकामा केला आहे.