नाशिक- येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तिन्ही प्रमुख आखाड्यांनी दीड हजार एकर जमीन कायमस्वरूपी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. तसेच, ‘शाही स्नान’ या संकल्पनेऐवजी ‘अमृतस्नान’ या नावाने स्नान सोहळा साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सिंहस्थ प्राधिकरणात साधू-संतांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम भूमिकाही महंत राजेंद्रदास महाराज यांनी मांडली आहे.