नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात २८३ एकर जागा साधूग्रामसाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जागामालकांना द्यावयाच्या मोबदल्यावर ५० टक्के रोख व ५० टक्के टीडीआर असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.