लासलगाव - शहरात सोमवारी (ता. २६) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने तडाखेबंद हजेरी लावत चांगलाच कहर केला. सायंकाळी सुमारे ६ वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापक केंद्रावर अवघ्या एका तासात तब्बल ६७ मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसाने शहरातील शिवाजी चौकात जलसंचय निर्माण केला असून, २० ते २५ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.