पंचवटी- भावाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या संशयातून दोघांनी फुलेनगर परिसरात एका युवकाचा डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. संजय तुळशीराम सासे (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, गुन्ह्यातील दोन संशयितांना अवघ्या चार तासांत पंचवटी पोलिसांनी अटक केली.