Nashik News : पंचशीलनगरमध्ये उभी रिक्षा जाळली; परिसरात भीतीचं वातावरण
Rickshaw Set on Fire in Panchshilnagar, Nashik : पंचशीलनगर परिसरात उभी रिक्षा पहाटेच्या सुमारास आगीत भस्मसात झाली. शेजारील रिक्षा आणि दुचाकीचेही नुकसान झाले.
जुने नाशिक- गंजमाळ येथील पंचशीलनगर परिसरात उभी असलेल्या रिक्षाची संशयितांनी जाळपोळ केली. ही घटना बुधवारी (ता. ४) पहाटे घडली. रिक्षास लागलेल्या आगीत शेजारील दुसऱ्या रिक्षाचेही नुकसान झाले. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.