नाशिक- जिल्ह्यात दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून, मजुरांच्या मागणीत वाढ होत आहे. पण, मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे वळत आहेत. एकीकडे पावसाचा जोर असताना गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ‘मनरेगा’च्या पाच हजार १६७ कामांच्या माध्यमातून २४ हजार ९९६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. प्रगतिपथावरील या कामांमध्ये घरकुलांची संख्या अधिक आहे.