नाशिक- शहरात ऑलिंपिक सप्ताहांतर्गत सुरू असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांत शुक्रवारी (ता. २७) विभागीय क्रीडासंकुलात झालेल्या मिनी फुटबॉल फाइव्ह राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळाले. राजस्थानचा संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत शनिवारी (ता. २८) सेपक टकरा स्पर्धा मीनाताई ठाकरे मैदानावर होतील.