National Peoples Court: नाशिक उद्या राष्ट्रीय लोकअदालत

national People Court
national People Court esakal

National Peoples Court : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात शनिवारी (ता.९) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव न्या. शिवाजी इंदलकर यांनी केले आहे. (National Peoples Court in Nashik tomorrow nashik)

जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील इतर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये दिवाणी, तडजोडपात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भूसंपादन, बँका, वित्तीय संस्था, शासकीय आस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपुर्व प्रकरणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

त्यासाठी वित्तीय संस्था, बँका, महावितरण, महापालिका, जिल्हा परिषद, विमा कंपन्या, शासकीय कार्यालये यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्व तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

national People Court
Nashik News: सांगा आता जगायचं तरी कसे? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल! टोमॅटोचा झाला लाल चिखल,भावात निचांकी घसरण

लोकअदालतीसाठी प्रलंबित प्रकरणांपैकी सुमारे २४ हजार ९७९ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एक लाख ५९५ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांनी केले आहे.

national People Court
Navratri 2023: सप्तशृंगी गडावर नवरोत्सवाची तयारी सुरू! प्रशासन लागले कामाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com