नाशिक : वृषाली, कौसल्या यांना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winner

नाशिक : वृषाली, कौसल्या यांना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर

नाशिक : नवी दिल्ली (New Delhi) येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्टस कंट्रोल बोर्ड यांच्यातर्फे देशांतील पाच खेळातील 33 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यात नाशिक जिल्हयाच्या दोन खो-खो खेळाडूंची निवड केली आहे. राज्य व देशातील सर्वोत्तम आक्रमकाचा पुरस्कार विजेती वृषाली भोये व आपल्या अष्टपैलू खेळाने महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारी कौसल्या पवार या दोघींचा यात समावेश आहे.

योजनेअंतर्गत ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या नाशिकच्या पहिल्या महिला खो-खो खेळाडू आहेत. या आधी नाशिकच्या दोन पुरुष खेळाडूंना ही शिष्यवृत्ती मिळाली होती. वृषाली व कौसल्या या दोघी संस्कृती नाशिक या संस्थेच्या खेळाडू असून त्या जिल्हा खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचलित शिवछत्रपती महाराज क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्रात सराव करतात. या दोघींना उमेश आटवणे व गीतांजली सावळे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली, खजिनदार सुनिल गायकवाड व अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: नाशिक : उच्च शिक्षित वधू- वराचा बैलगाडीने प्रवास

हेही वाचा: बीसीसीआय खेळाडूंना बायो बबलमधून काढणार बाहेर?

Web Title: National Sports Scholarship Announced For Vrushali Kausalya Of Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksportsScholarship
go to top