बीसीसीआय खेळाडूंना बायो बबलमधून काढणार बाहेर? | BCCI May End Bio Bubble For Team India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI May End Bio Bubble For Team India

बीसीसीआय खेळाडूंना बायो बबलमधून काढणार बाहेर?

मुंबई : बीसीसीआय (BCCI) भारतीय खेळाडूंना (Team India) बायो बबलमधून (Bio Bubble) बाहेर काढण्याच्या दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (South Africa) आगामी टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा विचार करून बीसीसीआय हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जेव्हापासून कोरोनाने (Coronavirus) जगाला विळखा घातला आहे. तेव्हापासून खेळाडूंचे जग बायो बबलमध्ये अत्यंत मर्यादित राहिले आहे.

हेही वाचा: PBKS vs CSK : शिखर धवनचा सीएसके विरूद्ध तिहेरी धमाका

दक्षिण आफ्रिकेविरूद्धची पाच टी 20 सामन्यांची दिल्ली, कटक, विझॅग, राजकोट, बंगळुरू या ठिकाणी 9 जून ते 19 जून पर्यंत होणार आहे. दोन महिने चालणाऱ्या आयपीएलच्या बायो बबलमध्ये सध्या खेळाडू वावरत आहेत. आयपीएलची समाप्ती 29 मे रोजी होणार आहे. त्यानंतर खेळाडू लगेच दुसऱ्या बायो बबलमध्ये जावेत असे बीसीसीआयला वाटत नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'जर सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि आता जशा नियंत्रणात आहेत तशा नियंत्रणात राहिल्या तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी कोणताही बायो बबल आणि कडक विलगीकरण असणार नाही. त्यानंतर भारतीय संघ आर्यलँड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्या दोन्ही देशात देखील कोणताही बायो बबल नसणार आहे.'

हेही वाचा: डेव्हिड कॉनव्हॉयने बांधली लग्नगाठ; CSK ने शेअर केला खास फोटो

बीसीसीआयला याची कल्पना आहे की बायो बबलमधील आयुष्य ही काही फार काळासाठीची संकल्पना नाही. एका ठराविक ठिकाणी कोंडून राहण्याने खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरित परिणाम होते. बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला की, 'काही खेळाडूंना ठराविक काळानंतर ब्रेक देण्यात येत आहे. मात्र तुम्ही त्याच्या वर उठून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की एका मालिकेतून दुसऱ्या मालिकेतील बायो बबलमध्ये जाणे. आता दोन महिने आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणे यामुळे खेळाडू मानसिकदृष्या खूप थकून जातात.'

Web Title: Bcci May End Bio Bubble From T20 Series Against South Africa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top