esakal | मालेगावात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

ncp agitation

मालेगावात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात येथील राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ४) निदर्शने करत आंदोलन केले. महिला कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


केंद्र शासनाने घरगुती गॅसच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. आधीच पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. सामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. महिला कार्यकर्त्यांनी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माजी आमदार आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सैय्यद यास्मीन यांच्या नेतृत्वाताखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो महिलांनी भाजप सरकारविरुद्ध स्वाक्षरी मोहिम राबविली. आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा: हेल्मेट नसेल तर वाहन जप्त; चालकांचे सक्तीने होणार समुपदेशन

loading image
go to top