Navratri 2022 : सप्तश्रृंगी देवीला पाच वर्षांनंतर बोकडबळी; शासनाने बंदी उठवली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devi Saptashrungi
Navratri 2022 : सप्तश्रृंगी देवीला पाच वर्षांनंतर बोकडबळी; शासनाने बंदी उठवली!

Navratri 2022 : सप्तश्रृंगी देवीला पाच वर्षांनंतर बोकडबळी; शासनाने बंदी उठवली!

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीला आता बोकडबळी देण्याची प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने यावरची बंदी उठवली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर आता बोकडबळीच्या प्रथेला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले

त्यामुळे यंदाच्या नवरात्रौत्सवापासून ही बोकडबळीची प्रथा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. २०१७ पासून ही प्रथा बंद करण्यात आली होती. ११ सप्टेंबर २०१६ ला जेव्हा बोकडाचा बळी दिला जात होता, त्यावेळी मानवंदना देताना बंदुकीतून झाडलेल्या छऱ्यामुळे १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे या प्रथेवर २०१७ पासून बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा: Kolhapur Mahalaxmi Temple Navratri Day 4 Pooja : आई अंबाबाईचं नवरात्रीच्या चौथ्या माळेचं रुप पाहिलंत?

मात्र या निर्णयाविरुद्ध न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या बाजूने निकाल देत कोर्टाने आता पाच वर्षांनंतर ही प्रथा पुन्हा सुरू केली आहे. नवरात्रीचा शेवट दसऱ्याच्या दिवशी होतो. या दिवशी आपला नवस पूर्ण करण्यासाठी बोकडबळी देण्याची प्रथा आहे. गडावर या बळी देणाऱ्या बकऱ्याची धामधुमीत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर न्यासाच्या वतीने हवेत गोळीबार करून मानवंदना दिली जाते आणि मग बोकडबळी दिला जातो.