Latest Marathi News | दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022

Shardiya Navratri 2022 : दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले

Shardiya Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांसह कुलदेवीचे घरोघरी आगमन होते. नवरात्रीच्या काळात देवीचा आशिर्वाद प्राप्त व्हावा यासाठी भाविक भक्त मोठ्या भक्तीभावाने नवदुर्गेचे पुजन करतात. नवरात्रोत्सवात कुमारिका पुजनाला विशेष महत्व आहे. देवीच्या प्रत्येक रुपात हातात विविध प्रकारची शस्त्र आहेत. प्रत्येक शस्त्राचे दुर्गा सप्तशती ग्रंथात विशेष महत्व सांगितले आहे. (Sharadiya Navratri Ghatasthapana 2022 Significance of weapons given to Goddess Devi by Gods)

हेही वाचा: Navratri Sanskriti: 'या' पद्धतीने करा देवीला कुंकुमार्चनाचा अभिषेक; देवी होईल आपोआप प्रसन्न

दुर्गा सप्तशती ग्रंथानुसार ज्या-ज्यावेळी असुरांनी देवलोक तथा पृथ्वीवर उच्छाद मांडला त्यात्यावेळी त्यांचा संहार करण्यासाठी देवीची आराधना करण्यात आली. असुरांचा विनाश करण्यासाठी देवतांनी आपल्याकडील शस्त्रे देवीला दिले होते. त्यामुळे देवीच्या हातात आपल्याला विविध प्रकारची शस्त्रे पाहायला मिळतात. कोणत्या देवतांनी देवीला कुठले शस्त्र दिले ते आपण जाणून घेवू.

देवतांनी देवीला शस्त्र याप्रमाणे -

त्रिशूल - देवीच्या हातात आपल्याला जे त्रिशूल दिसते ते भगवान शंकरांनी देवीला दिले आहे.

दिव्यास्त्र - दैत्यांचा संहार करण्यासाठी अग्नी देवाने देवीला दिव्यास्त्र दिले. याच दिव्यास्त्राचा उपयोग देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी केला.

तलवार - चंड आणि मुंड नावाच्या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने कालिकेचे विक्राळ रुप धारण केले होते. राक्षसांचा वध करण्यासाठी देवीला काल देवाने तलवार दिली होती.

धनुष्यबाण - दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी ज्यावेळी देवी युद्धभुमीत अवतरली त्यावेळी दैत्यांच्या सेनेचा विनाश करण्यासाठी पवन देवाने देवीला धनुष्यबाण दिले.

शंख - आपल्या कंपनाने तिन्ही लोकांत गुंजणाऱ्या शंखाचे स्वर कानी पडताच युद्धभुमीत आलेले दैत्य- असुर भितीने पळून जात. असा शंख वरुण देवाने देवीला दिला.

चक्र - विष्णूंनी दैत्यांचा संहार करण्यासाठी देवीला त्यांच्याकडील चक्र भेट केले होते.

घंटा - घंटानाद केल्याने असूर बेशुद्ध होत, तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी इंद्रदेवाने आपले वाहन हत्तीच्या गळ्यातील शंख काढून देवीला प्रदान केला.

हेही वाचा: Navratri, ९ वनस्पती : पचनसंस्थेपासून ते वीर्यवृद्धी, वाचा कोहळ्याचे औषधी गुणधर्म