Guardian Minister Dada Bhuse performing aarti of Kalika Devi
Guardian Minister Dada Bhuse performing aarti of Kalika Deviesakal

Navratri 2023: पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री कालिकेची आरती; 9 दिवसांत लाखो भाविक देवीच्या चरणी लीन

Navratri 2023 : ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी नवव्या माळेलाही भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (ता.२३) पूजा व आरती झाली.

रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. गेल्या नऊ दिवसांत लाखो भाविक देवीच्या चरणी लीन झाले.

दरम्यान मंगळवारी (ता. २४) दसऱ्याचे औचित्य साधत होणाऱ्या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसह कालिका देवस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे. (Navratri 2023 Aarti of Sri Kali by Chief Minister 9 days lakhs of devotees bathed at feet of Goddess nashik)

प्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात नवमी अर्थात नवव्या माळेला आणि विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री दादा भुसे यांनी दर्शन घेऊन कालिका मातेची आरती केली.

या वेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, माजी नगरसेवक शामकुमार साबळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे पालकमंत्री दादा भुसे यांचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी स्वागत केले.

याप्रसंगी कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ. प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, विश्वस्त आबा पवार, संतोष कोठावळे, किशोर कोठावळे, विशाल पवार, राम पाटील, भरत पाटील, दीपक तळाजीया आदी उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse performing aarti of Kalika Devi
Navratri 2023 : दसऱ्यादिवशी या किड्याचं दर्शन घडलं तर स्वत:ला नशिबवान समजा, का ते वाचा

लाखो रुपयांची उलाढाल

श्री कालिका देवी यात्रोत्सवानिमित्त मांडण्यात आलेल्या विविध खेळणी व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सला मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या नऊ दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. कोरोनामुळे दोन वर्ष ही उलाढाल ठप्प झाली होती.

त्यामुळे यंदा मोठी गर्दी उसळून छोट्या व्यावसायिकांच्या हातातही दोन पैसे पडले. देवस्थान व पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या विविध उपायांमुळे गत नऊ दिवसांच्या काळात भाविकांना भगवतीचे दर्शन सुलभ पद्धतीने घेता आल्याची प्रतिक्रिया संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी व्यक्त केली.

भाविकांच्या आग्रहास्तव दरवर्षीप्रमाणे यंदा दसऱ्याऐवजी कोजागरी पोर्णिमेपर्यंत नवरात्र महोत्सव सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

Guardian Minister Dada Bhuse performing aarti of Kalika Devi
Navratri 2023 : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 219 मुलींना ‘सुकन्या’चा लाभ; मनपात कुमारिकापूजन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com