आग्या हो विसरग्या हो’च्या गजरात चक्रपूजेचा जागर नवरात्रोत्सवात ग्रामदेवतेच्या आराधनेची परंपरा; पिढ्यान्‌पिढ्या जपला जाणारा धार्मिक विधी

आग्या हो विसरग्या हो’च्या गजरात चक्रपूजेचा जागर नवरात्रोत्सवात ग्रामदेवतेच्या आराधनेची परंपरा; पिढ्यान्‌पिढ्या जपला जाणारा धार्मिक विधी
Published on: 
पान एक ----------------------- 13261 वणी : नवरात्रोत्सवात अष्टमीनिमित्त राजेंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी देवीच्या मुखवट्यासह पारंपरिक पद्धतीने मांडलेली चक्रपूजा. ‘आग्या हो विसरग्या हो’ च्या गजरात चक्रपूजेचा जागर नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातील गावागावात ग्रामदेवतेची आराधना सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १८ : आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवात दांडियाचा उत्साह, देवीच्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि भक्तीमय सोहळ्यांची रेलचेल सुरू असतानाच गावागावात ग्रामदेवतेच्या आराधनेचाही जागर सुरू झाला आहे. नवरात्रातील ललितापंचमीपासून चक्रपूजेच्या पारंपरिक विधींना सुरुवात झाली असून, ‘आग्या हो विसरग्या हो’च्या गजराने घरोघरी भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. आदिमायेच्या शक्तिस्वरूपाची आराधना करण्यासाठी नवरात्रोत्सवात विविध धार्मिक विधी केले जातात. त्यात चक्रपूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये घटस्थापनेजवळ चक्रपूजेचे आयोजन केले जाते. काही भाविक नवसपूर्तीसाठी गडावरही हा विधी करतात. नवरात्रातील पाचवी, सातवी, आठवी आणि नववी माळ अशा ठरावीक दिवशी कुटुंबपरंपरेनुसार चक्रपूजा केली जाते. ----------- सात चक्रांची मांडणी, परंपरेचा विधी चक्रपूजेसाठी बुवा आणि बुराडी या पारंपरिक मांडणीचा वापर केला जातो. पूजेच्या तयारीत तांदूळ, कणकेचे दिवे, नारळ, पुरणपोळ्या अर्थात मांडे, पुऱ्या, करंज्या यासह विविध नैवेद्याचे पदार्थ ठेवले जातात. फळांसह पूजासाहित्याचाही समावेश असतो. पूजेच्या मुख्य जागी पांढऱ्या व रंगीत तांदळाचा वापर करून सात चक्रांची मांडणी केली जाते. चक्राच्या चारही बाजूंना दरवाजे तयार करून त्यांच्याजवळ मीठ, उडीद, तांदूळ आणि राख यांपासून चार मारुतींची प्रतीकात्मक रचना केली जाते. चक्रावर कणकेचे दिवे मांडले जातात. त्यातील ‘मेंढ्या’ हा प्रमुख दिवा मानला जातो. मुख्य जागी गोलाकार मांडलेल्या अकरा मांड्यांवर दिवे ठेवून पूजेची तयारी पूर्ण केली जाते. घरातील अखंड तेवणाऱ्या वातीवरून प्रमुख दिवा प्रज्वलित केला जातो. दिवा पेटताच ‘बोल अंबे की जय’चा जयघोष होतो आणि होमविधीने पूजेला धार्मिक स्वरूप प्राप्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com