
जुने नाशिक : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने मूर्ती कामांना वेग आला आहे. तर, दांडिया आणि गरबा प्रशिक्षण शिबिरांनाही गर्दी होऊ लागली आहे.
यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने मंडळांची संख्यादेखील वाढली होती. नागरिकांनीही मोठ्या उत्साहात दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा केला. (Navratri festival 2022 Rush to Dandiya Garba training camps nashik Latest Marathi News)
आता त्यांना वेध लागले आहे ते नवरात्रोत्सवाचे. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी देवीची स्थापना करून दांडिया, गरबाचे आयोजन केले जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष दांडिया आणि गरबाप्रेमींना आनंद घेता आला नाही. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त सण साजरे होत आहे.
त्यामुळे आता त्यांच्या नजरा नवरात्रोत्सववर लागून राहिल्या आहे. ठिकठिकाणी तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर दांडिया आणि गरबाचे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडून कामांना वेग आला आहे. शेरावाली, सप्तशृंगी, दुर्गा, रेणुकामाता अशा विविध प्रकारच्या मुर्ती तयार केल्या जात आहे.
नवरात्रोत्सवास काही दिवस राहिल्याने कारागिरांचे संपूर्ण कुटुंब मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहे. काही मूर्तींची तर तयार होण्यापूर्वीच बुकिंग झाली असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवप्रमाणे यंदा नवरात्रोत्सवही मोठ्या जोमात साजरा होणार आहे.
मूर्तीची मागणीदेखील वाढण्याची शक्यता आहे. मूर्तींची समाधानकारक विक्री होण्याची शक्यता असल्याने कारागिरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे घट बसविण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या, माठ, गरबा यासह दांडिया तयार करण्याचे कामेदेखील सुरू आहे.
तरुणाईमध्ये उत्साह
नवरात्रोत्सव म्हटले, की दांडिया आणि गरबा खेळण्याकडे सर्वांचा कल असतो. विशेषतः तरुण- तरुणींमध्ये दांडिया, गरबा खेळण्याचा उत्साह ओसंडून वाहतो. त्यासाठी पारंपारिक पोशाख खरेदी करणे, दांडिया आणि गरबा खेळण्याचे प्रशिक्षण घेणे.
नवरात्रोत्सव सुरू होताच मोठमोठे मंडळ, लॉन्स याठिकाणी आयोजित दांडिया, गरबा खेळ महोत्सवात सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला जातो. दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांना त्या आनंदास मुकावे लागले होते. यंदा मात्र दांडिया गरबा खेळण्याचा आनंद घेता येणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.