Nashik Monsoon : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पाऊस; पुढील नऊ दिवस पर्जन्यवृष्टी होणार का?
Weather Forecast and Yellow Alert : सोमवारी सायंकाळी नाशिक शहर आणि परिसरावर पावसाने अचानक हल्ला केला. तब्बल अडीच तास मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागांमध्ये पाणी साचले आणि शहरवासीयांची दैना उडाली.
नाशिक: घटस्थापनेच्या दिवशी, सोमवारी (ता. २२) सायंकाळी नाशिक शहर आणि परिसरावर पावसाने अचानक हल्ला केला. तब्बल अडीच तास मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागांमध्ये पाणी साचले आणि शहरवासीयांची दैना उडाली.