Navratri Festival : नाशिकमध्ये दांडियाची धूम: नवरात्रोत्सवासाठी पारंपरिक कपड्यांना वाढती मागणी
Rising Demand for Traditional Clothes During Navratri : नाशिकमध्ये नवरात्रोत्सवासाठी दांडिया व गरब्याचे प्रशिक्षण सुरू झाले असून, महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेसाठी बाजारात गर्दी करत आहेत. घागरा-चोली, धोती-कुर्ता असे विविध पोशाख बाजारात उपलब्ध आहेत.
जुने नाशिक: नवरात्रोत्सवानिमित्ताने पारंपारिक कपड्यांना मागणी वाढली आहे. बाजारात महिलांसाठी पारंपारिक बांधणीचे काम केलेल्या घागरा, चोली तसेच पुरुषांसाठी आकर्षक, रंगीबेरंगी धोती, कुर्ता कपडे विक्रीस बाजारात दाखल झाले आहे.