Nashik Bhadrakali Devi : नाशिकचे ग्रामदैवत भद्रकालीदेवी... छत्रपतींच्या काळात झाली होती पुनःस्थापना

Nashik Bhadrakali Devi
Nashik Bhadrakali Deviesakal

नाशिकच्या पुरातन भद्रकाली देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा, पुजारी, उपाध्याय, गुरुजी, मानकरी आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. या ग्रामदेवतेविषयी...

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कापलिनी ।

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ॥

(navratri special article on Village deity Bhadrakali Devi nashik )

भद्रकालीदेवी मंदिर हे नाशिकचे आद्य ग्रामदैवत तर आहेच, तसेच एक शक्तिपीठदेखील आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये देवीची मूळ ५१ शक्तिपीठे आहेत. ही शक्तिपीठे देवीच्या म्हणजेच सती पार्वतीच्या ५१ विभिन्न अशा अंगांचा भाग पडून निर्माण झाली आहेत.

ज्याप्रमाणे वैष्णवदेवी (जम्मू आणि काश्मीर), कामाख्यादेवी (आसाम), हिंगलाजमाता (पाकिस्तान) या शक्तिपीठाधीश देवी आहेत. भद्रकालीदेवी नाशिक हीदेखील प्रचंड जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी सती पार्वतीचा शरीराचा हनुवाटीचा भाग पडला. हनुवटीला संस्कृत भाषेत चिबुक असे म्हणतात, म्हणून यास्थानाला चिबूक स्थान असेही म्हणतात.

भद्रकाली मंदिर पूर्वी जुन्या नाशिकमध्ये होते. मुस्लिम आक्रमणात इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिरही उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतरच्या छत्रपतींच्या काळात हे मंदिर सध्याच्या जागी पुनर्स्थापित केले.

Nashik Bhadrakali Devi
Nashik Kalika Mandir : बैठक अवस्थेतील कालिकामातेच्या एकमेव मंदिरात नवरात्रोत्सव सुरू

अत्यंत प्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या या देवी मंदिरात दर वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे खूप नाजूक व काळजीपूर्वक त्याची कामे केली जातात. सध्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराचे रंगकाम, तसेच साफसफाई करण्यात आली. रोषणाई करण्यात आली आहे.

उत्सवानिमित्याने देवीचे सोन्याचे अलंकार, तसेच चांदीचे उपकरणे उजळण्याचे कामदेखील चालू आहे. शारदीय नवरात्र महोत्सव धार्मिक व पौराणिक पद्धतीने साजरा करत असल्याने मंदिराचे पुराणिक, उपाध्याय, गुरुजी, मानकरी वेगवेगळ्या पाठशाळा यांना देखील आमंत्रित करण्यात येत आहे. या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, पुराण, मंत्रजागरण, देवीची महाअभिषेक पूजन, सप्तशतीचा पाठ, यज्ञ याग आदी कार्यक्रम करण्यात येत आहेत.

हे मंदिर साक्षी गणेश मंदिराच्या मागील बाजूस असून, मंदिराचे बहुतांश काम लाकडी आहे. नाशिकचे ग्रामदैवत कोणते, याबाबत मतभिन्नता असली तरी जुन्याजाणत्यांच्या मते भद्रकालीदेवी हेच नाशिकचे ग्रामदैवत आहे. उदय दीक्षित देवस्थानचे विश्‍वस्त असून, उपेंद्र देव, अतुल गर्गे, सुरेश शुक्ल, मिलिंद गायधनी, नरेंद्र कुलकर्णी विश्‍वस्त म्हणून कार्यरत आहेत. मंदार कावळे हे मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी म्हणून काम पाहतात.

Nashik Bhadrakali Devi
Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगड...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com