Navratri
sakal
नाशिक: यंदाच्या नवरात्रोत्सवाला आगामी महापालिका निवडणुकीची किनार आहे. राजकीय किनार लाभल्याने नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांची विक्रमी संख्या वाढली. नवरात्रोत्सव ही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी मानून मंडळांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नवरात्रोत्सवामुळे शहरात १०० कोटींहून अधिकची उलाढाल अपेक्षित आहे.