Latest Marathi News | Navratrotsav 2022 : 3 पिढ्यांचा एकाच वेळी गरबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unique Ground at indiranagar

Navratrotsav 2022 : 3 पिढ्यांचा एकाच वेळी गरबा

इंदिरानगर (जि. नाशिक) : राणेनगर येथील युनिक मैदानावर युनिक ग्रुपतर्फे भरवण्यात आलेल्या महिलांच्या दांडीया- गरबामध्ये सासू, सून आणि नात तर काही कुटुंबातील आई, मुलगी आणि नात अशा तीन पिढ्या एकाच वेळी गरबा खेळतांनाचे चित्र दिसत आहे.

दररोज मिळणारी पैठण्या आणि इतर डझनावारी बक्षीसांमुळे तसेच महिलांसाठी सर्वात सुरक्षित असलेला गरबा अशी प्रसिध्दी सर्वत्र झाल्याने शहरभरातून महिला आणि युवती येथे हजेरी लावत आहेत. (Navratrotsav 2022 Garba of 3 generations at once on unique ground indiranagar nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Post Office Account Scheme : टपाल खात्यातील काही योजनांच्या व्याजदरात वाढ!

त्यामुळे काही काळ वेटिंग करावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. २९) भरपावसात शेकडो युवती गरबा खेळत होत्या. यावरून येथील गरबाची क्रेझ लक्षात येते. मंडपातील आकर्षक सप्तशृंगी देवीची मूर्ती, सजावट, शेजारीच प्रजापिता ब्रम्हाकुमारी परिवारातर्फे दररोज सादर होणारा आदिशक्तीच्या रुपांचा जिवंत देखावा आणि सोबत असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या रेलचेल मुळे होणारी गर्दी दररोज वाढत आहे.

शेवटच्या टप्प्यात आता येथे विशेष महिलांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे ही गर्दी वाढणार असून, त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे संयोजक तथा माजी सभागृह सतीश सोनवणे आणि अनिता सोनवणे यांनी दिली आहे.

हेही वाचा: गरबाचा जल्लोष, Bollywoodची क्रेझ अन् नटुन-थटुन तरूणाई मैदानात